Friday, October 05, 2007

बदल

well I am back.... बरेच दिवसानंतर...
दिवस का वर्ष झाली की (हा draft save केलेल्या पण १३ महिने होऊन गेले)
पण जागा झालो आहे खरा, म्हणतात ना देर से आये दुरूस्त आये...

चाकोरीबद्ध जीवन म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव गेले 3-४ वर्ष घेतो आहे.......
रोज सकाळी (हो उशिराच) उठायच
आवरून office गाठायच.... याहू जी-टोक la connect करायच
मग email (अर्थात personal ) बघायच्या......
मित्रांना reply करायचे.... ज्यांचे mail आले नाहीत त्यांना शिव्या देउन जागे करायचे
मग चहा (काम सुरू करायचे म्हणजे उत्तेजक पेय हवेच की हो :-) )
दिवस (आणि )नशिब बेकार असेल (आणि जास्त करून असेच दिवस जास्त असतात नशिबात)
तर meeting नावच्या officially acknowledged torture ला सामोरे जायचे.
मग त्यात व्यावसायिक भांडणे, मतभेद, कामाची टाळाटाळ हे सगळ आलच.
आणि या प्रकारातून सुटका झाली की आपल्याच अंगावर कसा जास्त काम टकून on-site लोक कसे फूकट बसून डोलर कसे कमावतात याच्या चविष्ट गप्पा.........
तोवर lunch time होतो, मग त्यानंतर शतपावली, परत चहा, टेबल टेनिस ब्रेक, संध्याकाळचे snakes sorry snacks :-)
दिवस संपला तरी कामाला सुरुवातच झाली नाही म्हणून tension..... मग ६ ते ९ slogging ..... आणि मग End Of Day email...
यातला ६ ते ९ चा भाग सोडला तर उरलेला program एकदम fix !
जाम कंटाळा आला ....
६ ते ९ वेळ हाताशी यायला लागल्यावर swimming join केले, जरा बदल मिळाला......
पण तेवढ्याने मन मानेना........
वाटलं job change करून पहावा.... कदाचित नशिब फळफळेल.....जरा routine बदलेल.....
पटा पट resume update केला monster नोकरी वर टाकून दिला........
२-३ महिन्यात २-३ interview देऊन नविन कार्यालयात रुजू पण झालो.....

नव्याचे नऊ दिवस संपले...... २-३ trainings झाली आणि प्रोजेक्ट allocate झाला आणि व्यावसायिक जीवनाच्या वास्तव सत्त्याकडे परत मी येऊन पोहोचलो....
२-३ संदर्भ इकडे तिकडे पण आयुष्य परत routine च्या दुष्ट चक्राच्या सापळ्यात जाऊन विसावलं.

शेवटी बुजुर्ग लोकांनी अनुभवावरूनच तर म्हणी बनवल्याना.....
घरोघरी मातीच्याच चुली आणि HP चे GAS !

(अहो तीच तीच म्हण किती दिवस वापरणार म्हणून थोडासा बदल आणि काय !!!!!!)

:-)

4 comments:

Unknown said...

ekdam zakas zala aahe...agadi accurate varnar kela aahes ...

Mahesh Suryawanshi said...

mast re, liha ajun bara asate, and if get some time to read

http://parathasarathi.blogspot.com/

निशा............ said...

lay bhari..........

Maneesha said...

sahich - masta lihilays :) "blogs" ha hya routine madhun baher padnyacha ek ajun marg..jowar tohi routine banat nahi tovar :))